शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा शैक्षणिक वारसा प्रेरणादायी : रामनाथ कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:56 IST

आधुनिक भारताच्या जडण-घडणीत शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा असून या संस्थांना इतिहास मोठा आहे.त्यात पुण्यातील संस्थांचा समावेश आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्याचा गौरव केला.

ठळक मुद्दे साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटनविद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जागतीक शिक्षणाबरोबरच मुल्य शिक्षणाची आवश्यकताशिक्षकांनी दिलेले ज्ञान हीच विद्यार्थ्यांची खरी ओळख

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून पुणे देशात प्रसिद्ध असून आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी याच पुण्यात घातला. तसेच लोकमान्य टिळक व त्यांच्या सहका-यांनी येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे पुण्याला मोठा शैक्षणिक वारसा असून तो येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्याचा गौरव केला. तसेच पुणे शहराच्या नावलौकीकात भर घालण्यासाठी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्ट योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्धघाटन प्रसंगी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्र्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी या प्रसंगी उपस्थित होते.कोविंद म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले असले पाहिजेत.तसेच विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच मुल्य शिक्षण व चांगले संस्कार रूजविणे गरजेचे आहे.शिक्षणात सुसंवाद ही संस्कृती निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी दिलेले ज्ञान हीच विद्यार्थ्यांची खरी ओळख असते. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपादन करून समाजाला व देशाला विसरू नये ,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त यावेळी केली.जावडेकर म्हणाले, गुणांची टक्केवारीतून निर्माण झालेली स्पर्धा घातक असून केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच पाठपुस्तकातील ज्ञान घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळे खेळणे आवश्यक आहे.दादा जे. पी. वासवानी यांनी देशाला नवीन शिक्षण पध्दतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व जागतीक शिक्षणाबरोबरच मुल्य शिक्षणाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.त्याचप्रमाणे नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास होण्यास मदत होईल,असेही यांनी सांगितले.कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. साधू वासवानी मिशनच्या गुलशन गिडवानी प्रास्ताविक यांनी केले.  प्राचार्या आरती पाटील यांनी आभार मानले.   

टॅग्स :PuneपुणेRamnath Kovindरामनाथ कोविंदeducationशैक्षणिकLokmanya Tilakलोकमान्य टिळक