पुणे : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या खाऊवाटपामध्ये शिक्षण मंडळाने घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. छापील किमतीपेक्षा जादा दराने ठेकेदाराकडून बिस्कीट पुड्यांची खरेदी करण्यात आल्याचे ‘मनविसे’ने निदर्शनास आणून दिले आहे.महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून दर वर्षी २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले जाते. याही वर्षी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये शिक्षण मंडळाकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी केला आहे. बिस्कीटवाटपाचा ठेका देताना संबंधित ठेकेदाराने ४.५० रुपयंचा प्रतिबिस्कीट पुड्याचा दर दिला आहे. प्रत्यक्षात बिस्किटाचा छापील दर ४ रुपये आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.
शिक्षण मंडळाचा खाऊवाटपात घोटाळा
By admin | Updated: January 28, 2017 01:54 IST