शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाचे अधिकार पुन्हा महापालिकेला ?

By admin | Updated: June 23, 2015 03:28 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण मंडळाचे आर्थिक अधिकार महापालिकेला आहेत. तरीही, महापालिकेने मेहेरबानी करून आपल्या अधिकारात मंडळातील सदस्यांना

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण मंडळाचे आर्थिक अधिकार महापालिकेला आहेत. तरीही, महापालिकेने मेहेरबानी करून आपल्या अधिकारात मंडळातील सदस्यांना अधिकार दिले होते. परंतु, मंडळातील अध्यक्षांनी केलेल्या शिक्षक बदली प्रकरणातील पराक्रमामुळे महापालिकेकडून अधिकार काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने शिक्षण मंडळ सदस्यांना मुदतवाढ दिली. त्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीने आपल्या अधिकारात शिक्षण मंडळाच्या सदस्यांना १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक खर्चाचे अधिकार दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदली देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी व लिपिक संतोष मेमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शिक्षण मंडळात झालेल्या या गैरप्रकाराची जबाबदारी अंतिमत: महापालिकेची आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने यापूर्वी महापालिका व शिक्षण मंडळाच्या अधिकाराविषयीचे स्पष्टीकरण दिलेले आहे. शिक्षण मंडळाचे अस्तित्व मुदत संपेपर्यंत राहणार असले, तरी ही यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली काम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने मंडळाला अधिकार देण्याचा घातलेला घाट चुकीचा आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या सदस्यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकडे लक्ष देण्याऐवजी बदली प्रकरणात हस्तक्षेप सुरू झाला आहे. त्यामुळे बदलीच्या प्रकरणाला केवळ मंडळाचे सदस्य जबाबदार आहेत, असे सांगून महापालिका पदाधिकारी व प्रशासन हात झटकू शकत नाही. यापुढील शिक्षण मंडळाच्या कारभाराची अंतिम जबाबदारी महापालिकेवरच राहील, असे पत्र सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे व आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. इ