शिक्षण मंडळालाच अखेर मिळाले अधिकार
By Admin | Updated: April 11, 2015 05:20 IST2015-04-11T05:20:40+5:302015-04-11T05:20:40+5:30
राज्य शासनाचे आदेश व सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी आज घेतला.

शिक्षण मंडळालाच अखेर मिळाले अधिकार
पुणे : राज्य शासनाचे आदेश व सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी आज घेतला. त्यामुळे धोरणात्मक व आर्थिक अधिकार मिळणार असल्याने सदस्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शिक्षण मंडळाला मुदत पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्याचा कायदा करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. त्याविषयी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने महापालिकेला आदेश देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाचे आदेश येईपर्यंत अधिकार देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांना शासनाचे आदेश प्राप्त झाले. विधी व न्याय विभागाचे आदेश लक्षात घेऊन शिक्षण मंडळावर कार्यरत असलेल्या सभासदांचा कार्यकाल संपेपर्यंत त्यांना अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुमाल कुमार यांनी आज घेतला.