शिक्षण मंडळ सभापतिपदी भुजबळ
By Admin | Updated: March 22, 2016 01:30 IST2016-03-22T01:30:17+5:302016-03-22T01:30:17+5:30
महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाचे चेतन भुजबळ यांची निवड बिनविरोध झाली आहे

शिक्षण मंडळ सभापतिपदी भुजबळ
पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाचे चेतन भुजबळ यांची निवड बिनविरोध झाली आहे. पुन्हा शिक्षण मंडळ निवडणुकीत एकदा आमदार लक्ष्मण जगताप गटाची सरशी झाली आहे.
सभापती आणि उपसभापतिपदी काम करण्याची संधी प्रत्येक सदस्यास मिळावी, यासाठी सहा महिने कालावधी निश्चित करण्यात आला. मुदत संपल्याने सभापती चेतन घुले यांनी राजीनामा दिला होता. त्यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली.
या पदासाठी माजी महापौर आझम पानसरे गटाचे शिरीष जाधव, माजी आमदार विलास लांडे समर्थक निवृत्ती शिंदे, आणि आमदार लक्ष्मण जगताप गटाचे समर्थक चेतन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. तिघांनीही या पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती. भुजबळ आणि शिंदे यापैकी कोणास संधी द्यायची, याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. दुपारी चारपर्यंत माघारीची मुदत होती. शेवटी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने भुजबळ यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सत्तारूढ पक्षाकडून जाधव यांचे नाव सुचविले होते. (प्रतिनिधी)