शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सुशिक्षित तरुणाईही भोंदू बाबांना बळी, धोक्याची सूचक घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:17 AM

एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असण्यात गैर काहीच नाही; मात्र सध्या दिशादर्शक गुरूंपेक्षाही तथाकथित भोंदू बाबांचे समाजात पेव फुटले आहे.

- नम्रता फडणीस / प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असण्यात गैर काहीच नाही; मात्र सध्या दिशादर्शक गुरूंपेक्षाही तथाकथित भोंदू बाबांचे समाजात पेव फुटले आहे. त्या व्यक्तीला आयुष्य समर्पित करून महत्त्वाचे निर्णय त्यांच्या म्हणण्यानुसार घेण्यासारखे गंभीर प्रकार समाजात घडत आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित तरुण पिढीही अशा भोंदू बाबांना बळी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. समाजातील तरुणाईचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले असल्याची ही एक सूचक घंटा आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडे पुणे जिल्ह्यातून वर्षभरात अशा प्रकारच्या ३५ केस आल्या असून, त्यातील ८० टक्के प्रमाण सुशिक्षितांचे आहे.मनुष्याने भौतिक सुखाच्या आहारी न जाता परमार्थाच्या वाटेवर चालण्यासाठी गुरू हा मार्गदर्शकाची मोलाची भूमिका बजावतो. मात्र, जेव्हा गुरूलाच आयुष्याचा सर्वेसर्वा मानले जाते, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम होऊ लागतात. लग्नाच्या बोहल्यावर चढताना मुलीचा फोटो गुरूला दाखविणे, त्याने नाही म्हटले तर तिला लग्न करण्यास नकार देणे, ‘माझ्यात देव अवतरतो’ असे सांगून भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समाजात वाढत चालले आहेत. सुशिक्षित भक्तही गुरूचा शब्द अंतिम मानून त्याच्या निर्णयाचा आयुष्यात अवलंब करताना दिसत आहेत.पूर्वीच्या काळापासून ग्रामीण भागात असे प्रकार घडत आले आहेत. मात्र, आता शहरी भागातील सुशिक्षितांमध्ये भोंदू बाबांच्या आहारी जाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. आयुष्यातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, स्पर्धेत मागे पडण्यातून येणारे नैराश्य, त्यातून उद्भवणारे मानसिक विकार यातून आध्यात्मिक शांतीसाठी गुरूला आधार मानणाऱ्यांचीच फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आयुष्यातील तणाव मर्यादेपलीकडे गेल्यास सहनशक्तीचा कस लागतो. मानसिक तणावांमुळे आत्मविश्वास कमी होतो, संशयी वृत्ती वाढते, मनात अस्थिरता निर्माण होते. अशा वेळी कोणतीही सामान्य व्यक्ती खंबीर आधाराच्या शोधात असते. तथाकथित गुरूच्या रूपात हा आधार मिळाला, की काहीसा दिलासा मिळतो. मात्र, अशा अगतिकतेचा भोंदू गुरू आणि बाबांकडून गैरफायदा घेतला जातो.अध्यात्म, आत्मिक शांतीच्या नावाखाली फसवणूक केली जाते. बाबांच्या मार्गदर्शनाखाली वाहवत गेलेल्यांना अनेकदा आर्थिक, मानसिक नुकसान सहन करावे लागते. स्वत:चे नुकसान करून घेण्यापेक्षा वेळीच या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचा आधार घ्यावा. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.>आईच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यात आईची जागा तथाकथित गुरूने घेतली. गुरूचे वय अवघे ५२ वर्षांचे. त्याने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असूनही आयुष्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय तो गुरूंना विचारूनच घ्यायचा. लग्नानंतरही त्याचे गुरूकडे जाणे सुरूच होते. त्यांचा भक्तगण मोठा होता. गुरू त्याच्याकडून स्वत:च्या वैयक्तिक गोष्टींसाठी पैसे मागायचा; तरीही त्याच्या मनात गुरूंबद्दल कधीच शंका आली नाही. एकदा तर गुरूने त्याला त्याचे घर गहाण ठेवण्यास सांगितले. मात्र, हे बायकोला कळाल्यावर तिने गुरूचे मनसुबे उधळून लावले. तरीही, त्याने गुरूकडे जाणे मात्र सोडले नाही.>राधा-कृष्ण ही त्याची श्रद्धास्थाने. एक बाई त्याला सांगते, की तिच्या अंगात राधा येते आणि ती त्याच्याशी बोलते. तो तिच्याशी संवाद साधू लागतो. तिच्यातील राधेच्या प्रतिमेमध्ये तो इतका अडकत जातो, की मानसिक संतुलनही हरवून बसतो. दोघांचे घर उद्ध्वस्त होण्यापर्यंत मजल जाते.>त्या दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम असते. त्यांनी अगदी लग्नाच्या आणाभाका घेतलेल्या असतात. मात्र, त्याच्यावर गुरूचा पगडा अधिक असतो. ‘या मुलीशी लग्न करू की नको?’ असे तो गुरूला विचारतो; पण गुरू ‘नको’ असा संकेत देतो आणि तो त्या मुलीशी लग्न करण्यास नकार देतो.>आपण कोणत्या तरी देवाचा अवतार असल्याचे भासवून भोंदू बाबा सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करतात. आर्थिक परिस्थिती, मानसिक आजार याबाबत चाचपणी करतात. आजारातून, तणावातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली जाते. अंनिसकडे वर्षभरात पुणे जिल्ह्यातून सुमारे ३५ केस दाखल झाल्या आहेत. या सर्व केसबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ८० टक्के प्रमाण सुशिक्षितांचे आहे. पूर्वीच्या तुलनेत अशा केसचे प्रमाण आता वाढले आहे. बाबा आपल्याला काही करतील, या भीतीने लोक तक्रार करण्यासाठी पुढे यायलाही घाबरतात. याबाबत समाजात जागृती होणे आवश्यक आहे.- नंदिनी जाधव,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस>समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी सरासरी २५-२८ टक्के लोकांमध्ये मानसिक आजार अथवा तत्सम लक्षणे दिसतात. त्यातून नैराश्य, चिडचिडेपणा, संशयी वृत्ती वाढीस लागते. अजूनही मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घेणे, हे समाजाच्या दृष्टीने सर्वसामान्य दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. मानसिक दडपण हाताबाहेर जाऊ लागल्यास नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याकडून तथाकथित गुरूकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक स्थिती कमकुवत झाली असल्याने लोक यामध्ये वाहवत जातात. आत्मविश्वास कमी झाल्याने परावलंबी होतात. अशा परिस्थितीत सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी कुटुंबीयांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.- डॉ. स्वप्निल देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ