सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST2020-12-08T04:09:54+5:302020-12-08T04:09:54+5:30
पाषाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन त्याचा वापर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. गुलामीत जीवन जगणाऱ्या ...

सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक
पाषाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन त्याचा वापर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. गुलामीत जीवन जगणाऱ्या माणसांना मुक्तीचा मार्ग डॉ. बाबासाहेबांनी दाखवला. सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक आहे, असे मत आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरचे प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आणि सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. सविता पाटील, प्रा. बी. एस. पाटील, डॉ. तानाजी हातेकर उपस्थित होते. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. तांत्रिक सहाय्य प्रा. कुशल पाखले, प्रा. स्नेहल रेडे, प्रा. एकनाथ झावरे यांनी कार्यक्रमासाठी मदत केली.