बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:34 PM2018-03-05T18:34:04+5:302018-03-05T18:34:04+5:30

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजºयाचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजºयात पाच बिबट्यांना ठेवण्यात आले आहे.

EcoFrenched cages at Leopard Shelter Center | बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे

बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे

Next
ठळक मुद्देवनविभागाच्या विशेष निधीतून पाच रात्र आणि दिवस पिंजरे निवारा केंद्रामध्ये नव्याने बांधण्यात आले आहे .इकोफ्रेंडली पिंजऱ्यात बिबटे आता मुक्त संचार करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजऱ्यांचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजऱ्यात पाच बिबट्यांना ठेवण्यात आले आहे.
बिबट्यांना चांगले वातावरण मिळावे यासाठी या पिंजऱ्यांची बांधणी करण्यात आली आहे. या वेळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक वनसंरक्षक वाय. पी. मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पिसाळ, बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, महेंद्र ढोरे, वनपाल कृष्णा दिघे, डी. डी. साळुंखे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला बिबट्यांना अपुऱ्या  जागेतील पिंजऱ्यात ठेवावे लागत होते. परंतु ,वनविभागाच्या विशेष निधीतून पाच रात्र आणि दिवस पिंजरे निवारा केंद्रामध्ये नव्याने बांधण्यात आले आहेत. या इकोफ्रेंडली पिंजऱ्यात बिबटे आता मुक्त संचार करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: EcoFrenched cages at Leopard Shelter Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.