पर्यावरणपूरक रिक्षा
By Admin | Updated: January 6, 2015 00:11 IST2015-01-06T00:11:11+5:302015-01-06T00:11:11+5:30
रिक्षांना दिल्या जाणाऱ्या सीएनजी किटच्या अनुदानासाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ हजार रिक्षामालकांनी हे किट बसवून पर्यावरणास हातभार लावला आहे.

पर्यावरणपूरक रिक्षा
पुणे : महापालिकेकडून शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी तीनचाकी रिक्षांना दिल्या जाणाऱ्या सीएनजी किटच्या अनुदानासाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल १४ हजार रिक्षामालकांनी हे किट बसवून पर्यावरणास हातभार लावला आहे. त्यामुळे रिक्षाद्वारे शहरात होणाऱ्या वायू प्रदूषणात मोठी घट होण्यास मदत होत असून, दरवर्षी या योजनेसाठीचा प्रतिसाद वाढतच आहे.
शहरात रिक्षांची संख्या सुमारे ४५ हजारांच्या घरात आहे. या सर्व रिक्षा काही वर्षापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर सुरू होत्या. तसेच शहरात प्रवाशांकडून रिक्षांचा वापरही मोठया प्रमाणात होत असल्याने प्रदूषणातही वाढ होत होती. त्यामुळे हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी वापरास रिक्षाचालकांनी प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून २0११-१२ पासून सीएनजी रिक्षा किट बसविणाऱ्या परवानाधारकांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यासाठी रिक्षाधारकांना आधी हे किट बसवून घ्यावे लागते.
त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून हे अनुदान रिक्षामालकांना धनादेशाद्वारे देण्यात येते. गेल्या चार वर्षांत या योजनेचा लाभ शहरातील सुमारे ११ हजार ९७३ रिक्षामालकांनी घेतला आहे. तर या वर्षी शहरातील सुमारे २00३ रिक्षाधारक या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता किट बसविणाऱ्या रिक्षाधारकांची संख्या या वर्षी तब्बल १४ हजारांच्या घरात पोहोचली आहे.
(प्रतिनिधी)
वर्षेरिक्षांची संख्याअनुदान तरतूद
2011-12 16512 कोटी
2012-13867212 कोटी
2013-1416502 कोटी
2014-1520032 कोटी 60 लाख
एकूण13,97618 कोटी 60 लाख