पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार
By Admin | Updated: March 30, 2017 02:41 IST2017-03-30T02:41:29+5:302017-03-30T02:41:29+5:30
महापालिकेच्या वतीने सोलर प्रकल्प व वृक्षारोपणासाठी सोसायट्यांनी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत

पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार
धनकवडी : महापालिकेच्या वतीने सोलर प्रकल्प व वृक्षारोपणासाठी सोसायट्यांनी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
दत्तनगर (आंबेगाव) येथील आॅलिव्ह सोसायटीच्या वतीने सोलरद्वारे उभारण्यात आलेल्या ५० किलोवॉट प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी झाले, त्या प्रसंगी महापौर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक वसंत मोरे, युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता किशोर गोराडे, विद्युत निरीक्षक एन. जे. सूर्यवशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे चेअरमन रवींद्र अकोलकर, राजेद्र मावळे, युगंधरा राजेशिर्के, पराग शहा, डॉ. विलास कांबळे, अमोल मोरे आदींनी केले.
आमदार भीमराव तापकीर यांनी सागीतले, की वृक्षारोपण, सोलर अशा प्रकल्पांना महापालिकेने अनुदान द्यावे. असे प्रकल्प राबविण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा.
(वार्ताहर)
कचऱ्याचा प्रश्न मिटला
सोसायटीने ३१ लाख रुपये खर्च करून १६८ सोलर पॅनेलच्या मदतीने विद्युतनिर्मिती सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ९० हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच, सोसायटीच्या आवारात विविध प्रकारची ४०० झाडे लावण्यात आली आहेत. जैविक खत प्रकल्पाद्वारे कचरा जिरवण्याच्या प्रकल्प उभारल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटत आहे, असे या वेळी सांगण्यात आले.