शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आॅनलाइन सुविधेमुळे कामे सोपी, दलालांची गोची : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:57 PM

परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

ठळक मुद्देब्रेक चाचणी पथाच्या कामासाठी १ कोटी ३१ लाख ७२ हजार रुपये मंजूर : रावतेजलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन

गराडे : परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. यापुढे लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही. आॅल इंडिया परमिट गाड्यांची देशात यापुढे कोठही तपासणी करू शकता. मात्र, रिक्षाबाबत ज्या भागात त्यांना परवाना दिला आहे. त्याच भागात त्यांची तपासणी करावी, तसेच त्याच भागात काम करावे. ब्रेक चाचणी पथाच्या कामासाठी १ कोटी ३१ लाख ७२ हजार रुपये मंजूर झाले आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.दिवे (ता. पुरंदर) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे अंतर्गत ब्रेक चाचणी पथाचे लोकार्पण रावते यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी रावते बोलत होते. परिवहन विभागाचे राज्याचे प्रधान सचिव मनोज सैनिक, सह परिवहान आयुक्त प्रसाद महाजन यांनी आपले विचार व्यक्त केले. मोटार वाहान निरीक्षक समीर सय्यद, श्रीराम कुलकर्णी, अश्विना मुसळे यांचा, तसेच या ट्रॅकसाठी ज्यांनी मदत केली त्यांचा हेल्मेट स्मृतिचिन्ह देऊन मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेstate transportराज्य परीवहन महामंडळonlineऑनलाइन