पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST2021-06-01T04:09:49+5:302021-06-01T04:09:49+5:30

पुणे : गेल्या चार दिवसांत मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झाली नसतानाच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी ...

East monsoon showers in western Maharashtra including Pune | पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी

पुणे : गेल्या चार दिवसांत मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झाली नसतानाच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी पुणे शहरात सायंकाळी सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी आल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १५ मिमी, तर लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्याबरोबर सांताक्रूझ ४८, पणजी ०.६, महाबळेश्वर ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माथेरान ७३, ओझर २२, धुळे १७, मार्गागोवा १४, अकोला १४, पेंडा १३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

१ जून रोजी पालघर, लातूर, परभणी, उस्मानाबाद हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात १ मार्चपासून आतापर्यंत १२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ७५ मिमीने अधिक आहे.

Web Title: East monsoon showers in western Maharashtra including Pune