आंबेगावच्या पूर्व भागातील शेतीची तहान भागणार

By Admin | Updated: April 29, 2017 03:56 IST2017-04-29T03:56:37+5:302017-04-29T03:56:37+5:30

डिंभेतून घोड शाखेला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लौकी, जाधववाडी, थोरांदळे, रांजणी येथील पिकांना पाण्याचा फायदा होणार आहे.

East of Ambegaon farming will be thirsty | आंबेगावच्या पूर्व भागातील शेतीची तहान भागणार

आंबेगावच्या पूर्व भागातील शेतीची तहान भागणार

मंचर : डिंभेतून घोड शाखेला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे लौकी, जाधववाडी, थोरांदळे, रांजणी येथील पिकांना पाण्याचा फायदा होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरी भागातील लौकी परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याची सातत्याने मागणी केली होती. लौकी ग्रामपंचायत वतीने जलसंपदा विभागाला पत्र देऊन पाणी सोडण्याची आग्रही मागणी करण्यात आल्यानंतर घोड शाखेला पाणी सोडले आहेत.
घोड शाखेला पाणी सोडल्याने कळंब, लौकी, जाधववाडी, थोरांदळे, भराडी, रांजणी, नागपूर येथील शेतीला पाणी मिळणार आह, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणीटंचाई असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पाणी सल्लागार समितीचे सभासद देवदत्त निकम यांनी पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित विभागाने तातडीने बैठक घेऊन मंत्री राम शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला आहे.

Web Title: East of Ambegaon farming will be thirsty