शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कमावत्या पत्नीही मागू लागल्याहेत पोटगी; पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 00:50 IST

घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश.

- सनील गाडेकरपुणे : घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश. मात्र पत्नी कमावती असूनदेखील ती पोटगी मिळण्यासाठी पत्नीला न्यायालयात खेचत आहे. तसेच आपल्या उत्पन्नाचा स्रोत न्यायालयापासून लपवत असल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत.स्वत:चा व मुले असतील तर त्यांचा खर्च भागेल एवढे पैसे ती कमावत असतानाही काही पत्नी या पतीच्या पैशावर डोळा ठेवत त्याच्याकडे पोटगीची मागणी करीत आहेत. हे सर्व करीत असताना ती आपण कसे परावलंबी आहोत, हे न्यायालयाल पटवून देताना खोटी माहिती सांगत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे परिस्थिती नसतानाही पतीला पत्नीस पोटगी द्यावी लागत आहे. पतीची आर्थिक कोंडी करायची, असाही त्यामागे उद्देश असल्याचे वकील सांगतात, तर काही प्रकरणांमध्ये पत्नी कमावती असतानाही त्यांना पोटगी मिळते. स्वावलंबी नसलेल्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत पोटगी मागण्याची तरतूद आहे. हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा हे विशेष कायदे तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ या विशेष कायद्यांमध्ये पोटगीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. या कायद्याअंतर्गत पोटगी मंजूर करताना न्यायाधीशांनी पतीची सांपत्तिक स्थिती कशी आहे व तिच्या गरजा काय आहेत, या बाबी लक्षात घ्यायला हव्यात.पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाचवेळेत व ठरलेली पोटगी मिळत नाही, म्हणून पत्नीने अर्ज केल्यास न्यायालय पतीच्या नावावर असलेल्या वस्तू विकून पोटगी देते, तर पतीच्या नावावर काही मालमत्ता नसेल, पण तो नोकरदार असेल तर पत्नीचे खाते पतीच्या खात्याला जोडण्यात येते. पतीचा पगार झाल्यानंतर पोटगीची रक्कम आपोआपच पत्नीच्या खात्यावर जमा होते. या दोन्ही बाबी करूनही पत्नीला दिलासा मिळत नसेल तर पतीविरोधात अटक वॉरंटदेखील बजाविण्यात येऊ शकते.

टॅग्स :Divorceघटस्फोट