ई-व्यवहाराचा वाढला भाव

By Admin | Updated: November 15, 2016 03:57 IST2016-11-15T03:57:21+5:302016-11-15T03:57:21+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कोणत्याही वस्तूची खरेदी, हॉटेलिंग किंवा इतर व्यवहार करण्यासाठी डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग अशा विविध ई-सेवांचा भाव

E-commerce increased prices | ई-व्यवहाराचा वाढला भाव

ई-व्यवहाराचा वाढला भाव

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कोणत्याही वस्तूची खरेदी, हॉटेलिंग किंवा इतर व्यवहार करण्यासाठी डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग अशा विविध ई-सेवांचा भाव वाढला आहे. व्यवहारात शंभर रुपयांच्या नोटांची चणचण जाणवू लागल्याने अनेक नागरिकांकडून भाजी, दूध खरेदीसाठीदेखील ई-व्यवहाराचा आधार घेतला जात आहे.
चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मागील मंगळवारी (दि. ८) घेण्यात आला. त्यामुळे बुधवारपासून रुग्णालये, मेडिकल, पेट्रोल पंप, रेल्वे, विमानाचे तिकीट वगळता इतर व्यवहारांतून या नोटा हद्दपार झाल्या. त्यामुळे पाचशे व हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच शंभरच्या नोटा घेण्यासाठी बुधवारपासून बँका, एटीएमबाहेर भल्यामोठ्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. या सोमवारीही शहरातील सुरू असलेल्या एटीएमबाहेर दिसून आल्या. अनेकांना आता दैनंदिन व्यवहारासाठीही सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ई-व्यवहारावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. तासन् तास रांगेत उभे राहून त्रासून जाण्यापेक्षा डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शहरातील हॉटेलमध्ये जाणाऱ्या ७० ते ८० टक्के खवय्यांकडून डेबिट, क्रेडिट कार्डांचा वापर केला जात आहे. ज्या ग्राहकांकडे कार्ड आणि सुटे पैसेही नाहीत, त्यांना काही हॉटेलचालकांकडून कूपन दिली जात आहेत. कपड्यांच्या बाजारपेठेतही बहुतेक व्यवहार कार्डांवर सुरू आहेत. बहुतेक कपड्यांच्या किंमती ५०० रुपयांपेक्षा अधिक असल्याने ग्राहक पूर्वी ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटा देत होत्या. आता मात्र, या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे नवीन नोटा किंवा सुटे पैसे असलेल्या ग्राहकांसोबतच रोखीने व्यवहार सुरू आहेत. मात्र, हे प्रमाण खूप कमी असून, जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी कार्डांद्वारे केली जात असल्याचे कपडे व्यावसायिकाने सांगितले.

Web Title: E-commerce increased prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.