शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

पोलीस उपनिरीक्षकानेच केले मुलीशी अश्लील वर्तन, पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 14:47 IST

उपनिरीक्षकाला केले तातडीने निलंबित

ठळक मुद्देरेमडेसिविरचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींकडून पार्टी घेताना घडला हा प्रकार

पुणे: रेमडेसिविरचा काळा बाजार करुन जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणार्‍या गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या निलंबित उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोस्को तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बालेवाडी येथील एका फ्लॅटमध्ये घडला. 

दीपक माने हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये सध्या कार्यरत होता. पोलीस आयुक्तांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाईक व फिर्यादीच्या दाजीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेला होता. माने व तिचा दाजी हे दारु पित बसले होते. त्यानंतर त्याने फिर्यादी व फिर्यादीची १६ वर्षाची बहिणीला बोलावून घेतले. मद्यधुंद अवस्थेत त्याने लहान मुलीबरोबर अश्लिल वर्तन करुन तिची छेडछाड केली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली. याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळून आल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक