दिघीत बुद्धमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
By Admin | Updated: January 23, 2017 02:52 IST2017-01-23T02:52:33+5:302017-01-23T02:52:33+5:30
येथील आदर्शनगरमधील पंचशील बुद्धविहारात पाच फूट उंच भव्य बुद्ध मूर्ती थायलंडमधून नुकतेच दाखल झाली होती. या मूर्तीची

दिघीत बुद्धमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
दिघी : येथील आदर्शनगरमधील पंचशील बुद्धविहारात पाच फूट उंच भव्य बुद्ध मूर्ती थायलंडमधून नुकतेच दाखल झाली होती. या मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी दिघी परिसरातून बुद्धमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करून प्रज्वलित ज्योत घेऊन शांततेचा संदेश दिला.
मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उपस्थित भन्ते सुमेधबोधी, भन्ते डॉ. हर्षबोधी, भन्ते अश्वजीत, भन्ते नागघोष, भन्ते पद्मसागर, भन्ते बुद्धघोष, भन्ते विनयबोधीजी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अध्यक्ष
वासुदेव अवसरमोल यांनी
प्रास्ताविक केले. दादाराव वानखडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचशील बुद्धविहार, रमाई महिला मंडळ, संविधान जनजागृती मंच, कपिलवस्तू बुद्धविहार, भारतरत्न मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पु. भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांच्या प्रयत्नाने बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात
पार पडला. (वार्ताहर)