दोन गटांत धुमशान

By Admin | Updated: April 27, 2017 04:51 IST2017-04-27T04:51:33+5:302017-04-27T04:51:33+5:30

आदिवासी भागातील इंगळूण गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने

Dushman in two groups | दोन गटांत धुमशान

दोन गटांत धुमशान

जुन्नर : आदिवासी भागातील इंगळूण गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने दोन्ही गटांच्या २५ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंगळुण गावातील देवीच्या यात्रेसाठी मोटारसायकलवरून जात असलेले गणेश डामसे यांना एका जीपगाडीचा धक्का लागला. याबाबत जीपचालकाला विचारणा करीत असताना दोघात वाद झाला. जीपगाडीत बसलेले शिवाजी रावते, मुकुंद रावते, सुनील उंडे, संदीप रावते, सत्यवान उंडे, सचिन उंडे, कल्पना रावते, इंदूबाई ढेगले, चंद्रभागा ढेंगले सर्व रा. सोनावळे महावीरवाडी यांनी लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी गणेश डामसेला मारहाण केली. यानंतर गणेश याने ही आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले .
भगवान डामसे, जालिंदर डामसे, अक्षय डामसे, योगेश डामसे, मुकेश डामसे, अमोल डामसे, कैलास डामसे, नितीन डामसे, अंकुश डोळस, यदु डोळस, दिनकर डामसे व लीलाबाई डामसे सर्व रा. इंगळुण ता. जुन्नर यांनी दुसऱ्या गटातील लोकांना शिवीगाळ करीत लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही गटांतील आरोपी जखमी झाले आहे. दोन्ही गटांतील परस्परविरोधी तक्रारी जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या. दोन्ही गटांतील २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील यांनी दिली. अधिक तपास उप निरीक्षक तपास सोमनाथ दिवटे व हवालदार देविदास खेडकर, निखिल खंदारे हे करीत आहे.

Web Title: Dushman in two groups