शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"युपीएच्या काळात प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता आणि पंतप्रधानांना..," अमित शाहंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 22:37 IST

शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीबाबत माहिती दिली. “मोदींना जेव्हा मुख्यमंत्री बनवलं तेव्हा संपूर्ण भारतातील मुख्यमंत्र्यांमध्ये ते एकमेव असे मुख्यमंत्री होते जे कधी निवडणूकच लढले नव्हते. सरपंचपदाचीही निवडणूक त्यांनी लढले नव्हते. त्यांनी भाजपच्या संघटनेचं काम केलं. भाजपनं अचानक त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला,” असं अमित शाह यावेळी म्हणाले.

“२००४ ते २०१४ ला कालखंडात युपीए सरकारनं देशात राज्य केलं. युपीए सरकार हे असं सरकार होतं. ज्यात प्रत्येक मंत्री आपल्याला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान मानत नव्हतं. पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं. पाकिस्तानातून दहशतवादी घुसून आपल्या जवानांचं शिर कापून त्यांचा अपमान करत होतो आणि दिल्लीत शांतता होती. १२ लाख कोटींचे भ्रष्टाचार देशासमोर एकापाठोपाठ आले. पंतप्रधानांनाच विदेशातही सन्मान नव्हता. ते विदेशात लिहिलेलं भाषण वाचत होते. कधी थायलंडचं भाषण सिंगापुरात तर कधी सिंगापूरचं भाषण थायलंडमध्ये. देशाला अपमान सहन करावा लागला. तेव्हा मोदींच्या नावाची घोषणा झाली आणि निवडणुका लाटेत बदलल्या. तेव्हा भाजपला पहिल्यांदा संपूर्ण बहुमत मिळालं,” असं अमित शाह म्हणाले.काळ सुवर्णाक्षरात लिहिला जाईल“२०१४ ला मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी सिद्ध केलं की हीच मल्टीपार्टी पार्लमेंट्री डेमोक्रेटिक सिस्टमद्वारे भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानी पोहोचू शकेल. २०१४ ते २०२२ पर्यंत काळ हा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. ७० वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज परिस्थितीत तशी नाही. गरीबांना घरं मिळाली आहेत. गॅसही मिळाला आहे. मोदींच्याच काळात हे शक्य झालं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे