लॉकडाऊनच्या काळात उपसरपंचाने स्वत: केली स्वच्छतेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:47+5:302021-06-16T04:13:47+5:30
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक विकास योजनेची कामे प्रलंबित पडले आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमुळे ग्रामस्थांची ...

लॉकडाऊनच्या काळात उपसरपंचाने स्वत: केली स्वच्छतेची कामे
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक विकास योजनेची कामे प्रलंबित पडले आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमुळे ग्रामस्थांची मोठी धांदल उडत असून काही ठिकाणी या फुटलेल्या पाईपलाईनमुळे पिण्याच्या पाण्याची योजना अडखळून पडली गेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वेळी नागरिकांना नागरी असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी उपसरपंच पोपट चौधरी यांनी समाजसेवेचा वसा हाती घेत कोरोनाच्या काळात थेट ग्राउंडवर उतरून कधी स्वच्छतेची कामे केली, तर कधी पाईपलाईन टाकण्यासाठी खड्ड्यात उतरले. विशेष म्हणजे चौधरी यांनी या कामासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत न घेता ही कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये माने-पिसे वस्ती पेयजल योजनेची दुरुस्ती, खिंडीचीवाडी पेयजल योजनेची दुरुस्ती, खोर गावठाण पेयजल योजनेची दुरुस्ती, खोर गावठाण दोन विहिरी जोडण्यास नवीन पाईपलाईन, उर्वरित सिंगल फेज लाईट जोडणी, शेतीपंपासाठी लाईट जोडणी अशी कित्येक कामे त्यांनी भर उन्हात मार्गी लावली आहेत. तसेच खोर ग्रामपंचायत परिसरात वृक्षसंपदा व वृक्षारोपण चळवळ राबविण्यात आली असून, कोरोनाच्या काळात त्यांनी तब्बल ८१ बाटल्या रक्त संकलन मोहीम यशस्वीरीत्या पार पाडून गावात रक्तदान शिबिर राबविले आहे.
--
जनतेने मला खोर ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसविले असून, त्यांची मी सेवा करणे ही माझी जबाबदारी असून, मी भर उन्हात कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जात असून अहोरात्र त्यांच्यासाठी मी कार्यतत्पर आहे.
- पोपट चौधरी (उपसरपंच, खोर ग्रामपंचायत)
--
फोटो क्रमांक : १४खोर उपसरपंच
फोटोओळ : खोर (ता. दौंड) ग्रामपंचायतचे उपसरपंच पोपट चौधरी हे भर उन्हात फुटलेल्या पाईपलाईन योजनेचे काम करताना दिसत आहेत. (छायाचित्र: रामदास डोंबे)