राजगुरुनगरला विसर्जनावेळी एक बुडाला

By Admin | Updated: September 6, 2014 00:02 IST2014-09-06T00:02:39+5:302014-09-06T00:02:39+5:30

प्रौढ गृहस्थाचा गणोश विसर्जन करताना चांडोलीच्या बाजूच्या भीमा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

During the immersion of Rajgurunagar, one is lost | राजगुरुनगरला विसर्जनावेळी एक बुडाला

राजगुरुनगरला विसर्जनावेळी एक बुडाला

राजगुरुनगर:- राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथील अनिल फडतरे  या प्रौढ गृहस्थाचा गणोश विसर्जन करताना चांडोलीच्या बाजूच्या भीमा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.  नदीच्या याच भागात गेल्यावर्षी वडील आणि मुलाचा एकाच वेळी बुडून मृत्यू झाला होता. बेकायदा वाळू उपशामुळे झालेल्या खडय़ांमुळे पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडत आहेत.
याबाबतची माहिती अशी कि, राजगुरुनगर लगत असलेल्या राक्षेवाडी येथे राहणारे अनिल आनंदराव फडतरे (वय 49) हे त्यांच्या घरी बसविलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल चांडोली बाजूकडून भीमानदी तीरावर गेले होते. कडूस रस्त्याकडून नदीतीरावर जाण्यास रस्ता असल्याने त्यांनी हे ठिकाण निवडले. स्वत:च्या मोटारीतून आपला आणि शेजा-यांचा ही एक गणपती त्यांनी विसर्जनासाठी नेला होता. चांडोली स्मशान भूमिजवळ कुटुंबियांसमवेत गणपतीची आरती केल्यानंतर गणपती विसर्जन करतांना अनिल फडतरे पाण्यात उतरले. येथे असलेल्या डोहातील खोलीचा अंदाज न आल्याने ते गणपती बुडवत असताना अचानक खोल पाण्यात गेले. पोहता येत नसल्याने त्यांची दमछाक झाली. त्यांच्या प}ीने  त्यांना वाचविण्यासाठी साडी पाण्यात टाकली मात्र त्यांना ती पकडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. अनिल फडतरे हे त्यांची लहान मुले,प}ी व भाऊ यांच्या डोळ्यासमोर बुडाले पण त्यांना कोणीही वाचवू शकले नाही.  कारण कोणालाही पोहता येत नव्हते. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख करीत आहेत.
 
कापूरहोळ : कासुर्डी गु. मा. (ता. भोर) येथे गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गणोश विसजर्नासाठी गुंजवणी नदीत बुडालेले उद्धव मालुसरे यांचा मृतदेह सकाळी 1क् वाजण्याच्या सुमारास नदीत सापडला. सकाळी 7 वाजता एनडीआरएफचे जवान व स्थानिक कातकरी यांनी बराच वेळ नदीत शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर 1क् च्या सुमारास मृतदेह मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव मालुसरे ज्या ठिकाणी बुडाले होते, त्या चहूबाजूचा नदीतला भाग जवानांनी पिंजून काढला; मात्र मृतदेह सापडला नव्हता. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना कासुर्डी गु.मा. येथील दत्तमंदिर येथील कातकरी मारुती पवार, विलास मोरे, शिवाजी काटेकर, सतीश घोंगरेकर पाण्यात उतरले. ज्या ठिकाणी ते बुडाले, त्याच ठिकाणी बाजूस पाण्याच्या तळाशी मृतदेह या कातक:यांना सापडला. शवविच्छेदनासाठी मृतदेह भोरला नेण्यात आला. सायंकाळर्पयत 3 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
केडगावला दोन बालकांचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे पाण्याच्या टाकीत पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जोगेंद्र निशाद (वय 5), इम्रान ठाकूर (वय 8, दोघेही राहणार केडगाव, ता. दौंड) या चिरमुडय़ांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात हरिश्चंद्र चव्हाण या ठेकेदाराचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान बालकांचे आई-वडील वरील ठेकेदाराकडे मजुरीचे काम करीत होते. 

 

Web Title: During the immersion of Rajgurunagar, one is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.