शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या काळात आतापर्यंत एसटीचा २२ कोटी महसुल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 19:20 IST

मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

ठळक मुद्देकाही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याने एसटी बसेसला लक्ष्यआंदोलनाच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने एसटीकडून सतर्कता

पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान दि. २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. यामध्ये एसटी बसेसचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असून २२ कोटी रुपयांचा महसुल बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला. या काळात काही ठिकाणे मोर्चे, निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याने एसटी बसेसला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये बस थांबवून काचा फोडण्यात आल्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले. यादरम्यान राज्यभरात दि. २० ते २९ जुलै या दहा दिवसांत ३५३ बसेस फोडण्यात आल्या आहेत. सोमवारी चाकण, सोलापुरसह अन्य भागांतही बसेस जाळण्याात आल्या असून काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सोमवारपर्यंत हा आकडा पावणे चारशेच्या पुढे गेल्याची शक्यता आहे. या घटनांमुळे एसटीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचा २२ कोटी २ लाख १३ हजार ७४९ रुपयांचा महसुल बुडाला आहे. आंदोलनाच्या काळात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने एसटीकडून सतर्कता घेतली जात आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी किंवा मार्गावर बससेवा बंद करण्याचा निर्णय तातडीने घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरChakanचाकणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा