घाण टाकल्याने कोयत्याने मारहाण
By Admin | Updated: November 16, 2016 03:02 IST2016-11-16T03:02:38+5:302016-11-16T03:02:38+5:30
खराबवाडी (ता. खेड) येथे ड्रेनेजमधील घाण रस्त्यावर टाकल्यावरून एकाला कोयत्याने मारहाण केली असून, या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाण टाकल्याने कोयत्याने मारहाण
चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथे ड्रेनेजमधील घाण रस्त्यावर टाकल्यावरून एकाला कोयत्याने मारहाण केली असून, या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज (दि. १५) दुपारी दोन वाजता घडली. रस्त्यावर गटारातील ड्रेनेजची घाण टाकल्यावरून शंकर मारुती कोतेकर (रा. खराबवाडी, चाकण) याने तुषार बाळासाहेब लोंढे (वय १९, रा. खराबवाडी, चाकण) याला कोयत्याने मारहाण केली. तसेच, इतर सहा जणांनी त्याची आजी व त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मथाबाई सावळेराम लोंढे (वय ६०, रा. खराबवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिल्यावरून आज सायंकाळी साडेसहा वाजता शंकर व इतर सहा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेअंमलदार विठ्ठल कुंभार यांनी दिली.
पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)