शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:02 IST

लग्न ठरलेल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आप्तस्वकीयांना देण्यासाठी दुचाकीवरून पुणे येथे निघालेल्या पती-पत्नीस मागून भरधाव आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले.

लोणी काळभोर : लग्न ठरलेल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आप्तस्वकीयांना देण्यासाठी दुचाकीवरून पुणे येथे निघालेल्या पती-पत्नीस मागून भरधाव आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले. ही दुर्दैवी घटना पुणे-सासवड राज्य मार्गावर आज दुपारी १च्या सुमारास घडली.या अपघातात संपत रघुनाथ अवचरे (वय ६१) व वंदना संपत अवचरे (वय ५२, रा. अव्हेन्यू सोसायटी, वडकी, ता. हवेली) हे पती-पत्नी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी वंदना यांचे बंधू उमेश धर्माजी गायकवाड (वय ४४, रा. सिद्धार्थनगर, वडकी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.मुलगी प्रियंका हिच्या विवाहाच्या पत्रिका आप्तस्वकीय व मित्रमंडळींना देण्यासाठी अवचरे दाम्पत्य दुचाकीवरून (एमएच १४-एफपील २१६९) पुणे येथे निघाले होते. ११.३०च्या सुमारास ते उमेश गायकवाड यांच्या घरी गेले. तेथे चहापान करून १२.१५च्या सुमारास पुण्याकडे निघाले. दुपारी १ च्या सुमारास ते उरुळी देवाची गावाच्या हद्दीत असलेल्या सासवड-पुणे राज्यमार्गावर असलेल्या गायत्री साडी सेंटरसमोरील पुलावर आले. या वेळी मागून आलेल्या भरधाव डंपरने (एमएच १२-एचडी ८८१५) त्यांना धडक दिली. दुचाकीवरून दोघेही रस्त्यावर पडल्याने व डंपरचे पुढील चाक त्यांचे अंगावरून गेल्याने दोघेही चिरडले गेले. यातच त्यांचा अंत झाला.पुणे-सासवड राज्यमार्गावर सातववाडी ते सासवडदरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बहुतांश ठिकाणच्या साईडपट्ट्या खचल्याने एक ते दीड फुटाचेखड्डे तयार झाले आहेत. यामुळे या मार्गावर सतत अपघात होतात. काही वर्षांपासून रस्तारुंदीकरणाच्या फक्त घोषणा होत आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात मात्र होत नाही. आजच्या अपघातात मुलीचे लग्न पाहण्याअगोदरच आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर रस्तादुरुस्ती करणार? असा सवाल प्रवासी व रस्त्यालगत राहणाºया नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे