केबलसाठी खोदला रस्ता
By Admin | Updated: September 30, 2015 01:14 IST2015-09-30T01:14:23+5:302015-09-30T01:14:23+5:30
काटेवाडी (ता. बारामती) येथील बारामती- इंदापूर रस्त्यावर मोबाईल कंपनीने केबलसाठी रस्त्यालगत चारीचे खोदकाम केले आहे

केबलसाठी खोदला रस्ता
काटेवाडी : काटेवाडी (ता. बारामती) येथील बारामती- इंदापूर रस्त्यावर मोबाईल कंपनीने केबलसाठी रस्त्यालगत चारीचे खोदकाम केले आहे. खोदकाम करताना खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बारामती-इंदापूर रस्त्यालगत भवानीनगरपासून काटेवाडी परिसरात सतत मोबाईल कंपनीच्या वतीने केबल बुजविण्यासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना निघणारा मुरूम, माती रस्त्यावर पसरल्याने वाहतूक करताना वाहनचालकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. लोकवस्तीतील मोठे खड्डे बुजविण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यालगत खड्डा व घुले यांच्या घरासमोरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहने जोरात वेगाने खड्ड्यात आपटत आहेत. त्यामुळे दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुढील महिन्यात श्री छत्रपती साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूकही वाढणार आहे. रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी
केली आहे.