लग्नामुहूर्तांमुळे गुरुवारची पाणीकपात टाळली, शुक्रवारी पुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:33+5:302021-01-08T04:26:33+5:30
पुणे : पाणीपुरवठा विभागाच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग तसेच जलकेंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत/पंपिंग ...

लग्नामुहूर्तांमुळे गुरुवारची पाणीकपात टाळली, शुक्रवारी पुरवठा राहणार बंद
पुणे : पाणीपुरवठा विभागाच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग तसेच जलकेंद्र, एसएनडीटी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करावयाची असल्याने या केंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवणार होता. परंतु, गुरुवारी लग्नाचे मुहूर्त असल्याने नागरिकांची गैरसोय नको म्हणून लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हा दिवस बदलण्याची विनंती केली. त्यानंतर, प्रशासनाने गुरुवारऐवजी शुक्रवारी (दि.८) पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पाणी बंद असलेले भाग पुढीलप्रमाणे :
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग) : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
चतु:शृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र परिसर :- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इत्यादी परिसर, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे महामार्ग परिसर, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉॅप्युलरनगर, अतुलनगर, शाहू काॅलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर इत्यादी.
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क-ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी.
नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग :- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर इत्यादी.