शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक कोंडीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर पोहचताना दमछाक.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:57 IST

पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मेट्रो, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे.

पुणे : परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसह पालकांवरही प्रचंड दडपण असते. त्यात दहावीची परीक्षा असेल तर विचारता सोय नाही. पाल्याचा अभ्यास, परीक्षा केंद्रावर त्याला वेळेत पोहचवणे, अशी भरपूर धावपळ करत पालक आणि विद्यार्थ्यांची सुरु असते.अशातच रस्त्यावर जर वाहतुक कोंडी निर्माण झाली तर साहजिकच सर्वांचेच धाबे दणाणले जातात. हेच चित्र कोथरूडमधील पौडरोडवर सकाळी अकरा वाजता दहावीच्या पेपरसाठी पोहचताना विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाक झाली. रस्त्यावर वाहने लावूनच पालकांनी परीक्षा केंद्राकडे जोऱ्यात धाव घेतली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि.१) पासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भाषा विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये पहिल्या सत्रात मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी तर दुपारच्या सत्रात द्वितीय व तृतीय भाषेच्या जर्मन, फ्रेंच या विषयांची परीक्षा पार पडली. पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मेट्रो, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे.  विद्यार्थ्यांना शहरातील परीक्षा केंद्रावर पोहचण्यात त्रास होत आहे. शनिवारी सकाळी सुतारदरा आणि किष्किंधानगर परिसरातून येणारी चार चाकी वाहने जवळचा रस्ता म्हणून शिवराय शाळे समोरून ये-जा करतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शनिवारी दहावीच्या पेपरला उपस्थित राहताना विद्यार्थ्यांसह पालकांची उडालेली तारांबळ चिंताजनक होती. प्रत्येकजण जमेल तिथे वाहन उभे करत परीक्षा केंद्राकडे धावत होता. त्यामुळे राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शाळेसमोरील रस्ता परीक्षा कालावधीत बंद करण्याची मागणी मनसे विभाग प्रमुख सुभाष आमले यांनी प्रशासनाला केली आहे

टॅग्स :kothrudकोथरूडexamपरीक्षाTrafficवाहतूक कोंडीStudentविद्यार्थी