पुणे : मार्केट यार्डात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. तो बेवारस असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत पोलीस हवालदार शंकर पवार यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक नऊच्या परिसरातून २८ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पादचारी निघाला होता. पाऊस खूप जोरात होता. पावसामुळे पुढचे काहीच न दिसल्याने रिक्षाची पादचाऱ्याला पाठीमागून धडक बसली. अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. त्याला रिक्षाचालकानेच रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. तो बेवारस असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील तपास करत आहेत.
पावसामुळे पुढचे काहीच न दिसल्याने रिक्षाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, मार्केटयार्डातील घटना
By नम्रता फडणीस | Updated: August 6, 2024 16:02 IST