शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Indapur News: संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 11:59 IST

गढाचे संवर्धन होण्याआधी ही पडझड रोखण्याचे उपाय योजावेत, इंदापूरकरांची मागणी

इंदापूर : गेल्या आठवडाभरापासून लागून राहिलेल्या संततधार पावसाने तमाम इंदापूरकरांचा मानबिंदू असणा-या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या प्रवेशद्वाराजवळच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याचा प्रकार आज (दि.२) उघडकीस आला आहे. गढाचे संवर्धन होण्याआधी ही पडझड रोखण्याचे उपाय योजावेत, अशी मागणी इंदापूरकरांकडून होत आहे.   छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची कसबा पेठेनजीकची गढी हा इंदापूरकरांचा मानबिंदू आहे. ऐतिहासिक ठेवा असणा-या या गढीचे संवर्धन व्हावे अशी इंदापूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र या पूर्वीचे तहसीलदार नागेश पाटील यांनी गढीच्या उत्तरेच्या भागाचे सपाटीकरण करुन तेथे रस्ता बनवण्याचा प्रकार केला. त्यामुळे गढीचा साचा बदलून गेला होता. त्या विरुध्द पहिल्यांदा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आवाज उठवला होता. या कारवाईच्या मागणीसाठी आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते आवाज उठवत राहिले. त्यानंतर प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे यांच्या नेतृत्वाखालील गढी संवर्धन समितीने आंदोलनात्मक पावले उचलली. त्यामुळे गढीचे विद्रूपीकरण थांबले.  मध्यंतरीच्या काळात आ. दत्तात्रय भरणे यांनी संवर्धनाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही भाजपच्या दारातून आपल्या परीने संवर्धनासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र या दोघांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात श्रेयवादाचा ही वास होता. या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर,नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी व व्हीसीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची बैठक घेतली. मालोजीराजे यांची गढी व हजरत चाँदशाहवली दर्गाहच्या संवर्धन व सुशोभीकरणा संदर्भातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावेत असे आदेश दिले.

या पार्श्वभूमीवर संततधार पावसामुळे गढीच्या प्रवेशद्वाराजवळच्या बुरुजाचा काही भाग कोसळल्याचा प्रकार घडला आहे. सकाळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अहेमदरजा सय्यद, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार व इतरांनी त्या ठिकाणची पाहणी केली.या वेळी बोलताना श्रीधर बाब्रस म्हणाले की, ही गढी आम्हा सर्वांचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जपण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आ. दत्तात्रय भरणे प्रयत्नशील आहेत. संवर्धन होईल त्या वेळी होईल मात्र त्या आधी गढीच्या बुरुजाची पडझड रोखली जावी यासाठी नगरपरिषदाने डागडुजी करावी. या संदर्भात आपण इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी चर्चा केली आहे. नगरपरिषदेच्या अभियंत्यांना बुरुजाच्या पडझडीबाबत कल्पना दिली आहे. ते उद्या पाहणी करतील. त्यानंतर तातडीने पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोकमत शी बोलताना मुख्याधिकारी कापरे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडGovernmentसरकार