स्वाइन फ्लूमुळे राज्यात ९ मृत्यू
By Admin | Updated: September 24, 2015 02:49 IST2015-09-24T02:49:54+5:302015-09-24T02:49:54+5:30
स्वाइन फ्लूचे थैमान राज्यभरात चालू असून, आज या आजाराने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे

स्वाइन फ्लूमुळे राज्यात ९ मृत्यू
पुणे : स्वाइन फ्लूचे थैमान राज्यभरात चालू असून, आज या आजाराने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या आजारांच्या बळींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात सांगलीमध्ये २, रायगड, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे येथील अनुक्रमे १, तर बेळगावमधील एकाचा स्वाइन फ्लूमुळे बळी गेला. आज एकूण ७२०८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ६१३ संशयितांना आॅसेलटॅमिवीर हे स्वाइन फ्लूचे औषध देण्यात आले.(प्रतिनिधी)