शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:06 IST

प्रवाशांची मिळाली पसंती : खासगी ट्रॅव्हल्सला दिली टक्कर, प्रवासी वाढले

पुणे : दिवाळीत दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देणाऱ्या अनेक प्रवाशांची पावले यंदा एस.टी. महामंडळाच्या शिवशाहीकडे वळली. त्यामुळे शिवशाहीमुळे एसटीची दिवाळी झाल्याचे चित्र आहे. एसटीच्या पुणे विभागाचे संचलन कमी होऊनही यावर्षी उत्पन्नात जवळपास ४१ लाखांहून अधिक वाढ झाली आहे. शिवशाहीने खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर दिल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे ट्रॅव्हल व्यावसायिकांनी मान्य केले.

दिवाळीनिमित्त एसटीकडून दरवर्षी जादा बसचे नियोजन केले जाते. यावर्षी पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त जवळपास ४५० जादा बस सोडल्या. यावर्षी नियमित बससह जादा बसमध्ये आरामदायी वातानुकूलित शिवशाही बसचा समावेशही होता. मागील वर्षी या बस महामंडळामध्ये दाखल झाल्या असल्या तरी दिवाळीमध्ये कर्मचाºयांच्या संपामुळे संचलन होऊ शकले नाही. त्यानंतर यंदा दिवाळीपर्यंत दिवसेंदिवस शिवशाहीची मागणी वाढत गेली. दिवाळीतही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाला दि. १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ७ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये शिवशाहीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा १ कोटीहून अधिक आहे. पुणे विभागात ८५ शिवशाही बस असून त्यामध्ये ८३ बस आसनी तर दोन बस शयनयान आहेत.

२०१६मध्ये दिवाळीच्या काळात पुणे विभागाला ७ कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये यंदा सुमारे ४२ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यावर्षी २०१६ च्या तुलनेत बसची एकूण धाव कमी झाली आहे. २०१६मध्ये विभागातील बसचे एकूण किलोमीटर २१ लाख ३९ हजार एवढे होते. यावर्षी त्यामध्ये १ कोटी ६४ लाखांनी घट झाली. असे असूनही विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवशाहीला मिळालेली पसंती तसेच जादा गाड्यांच्या नियोजनामुळे यंदा प्रवासी संख्येत वाढ झाल्याने उत्पन्नही वाढले आहे. दि. ६ नोव्हेंबरनंतरही एसटीला मोठी गर्दी आहे. त्यामुळे एकूण दिवाळीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच मार्गावरील विविध थांब्यांपासूनही आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.खासगी ट्रॅव्हल्सला फटकापुणे जिल्ह्यात ६०० ते ७०० ट्रॅव्हल्स आहेत. दिवाळीच्या काळात प्रत्येक गाडीच्या सरासरी ३ ते ५ फेºया होतात. यंदाची उलाढाल ४ ते ५ कोटींपर्यंत झाली असण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कर्मचारी संपामुळे एसटीची सेवा बंद होती. यावर्षी एसटीने जादा गाड्यांचे नियोजन तसेच शिवशाहीने उत्पन्नावर परिणाम झाला. शासनाने एसटीच्या भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे भाडे वाढविण्यात आले नाही. यंदा प्रवाशांची संख्याही कमी होती. इंधन दरवाढ व महागाईचाही परिणाम झाला.- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष,पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस ओनर्स असोसिएशनपुणे विभागाचे १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्नवर्ष उत्पन्न एकूण धाव (कि.मी.)२०१६ ७ कोटी १० लाख १९ लाख ७५ हजार२०१८ ७ कोटी ५२ लाख २१ लाख ३९ हजारशिवशाहीने यंदा खºयाअर्थाने एसटीची दिवाळी केली आहे. नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, अकोला यांसह खासगी ट्रॅव्हल्सला अधिक मागणी असलेल्या सर्वच मार्गांवर शिवशाहीला अधिक पसंती मिळाली. सर्व शिवशाही गाड्यांचे आरक्षण दि. ६ नोव्हेंबरपर्यंत फुल्ल होते. तसेच भाऊबीजेपर्यंत परतीच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षणही फुल्ल झाले होते. आरामदायी सेवेमुळे प्रवाशांनी शिवशाहीला अधिक पसंती दिली.- यामिनी जोशी,वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ 

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीDiwaliदिवाळी