अधिकाराच्या वादात साहित्य खरेदी रखडली
By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-26T00:42:10+5:302014-07-26T00:42:10+5:30
शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, खरेदीविषयीचे अधिकार आयुक्तांना की सदस्यांना, हा वाद सुरू आहे.

अधिकाराच्या वादात साहित्य खरेदी रखडली
पुणो : शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, खरेदीविषयीचे अधिकार आयुक्तांना की सदस्यांना, हा वाद सुरू आहे. त्याविषयी स्पष्टता नसल्याने शाळेतील विद्यार्थी दीड महिन्यापासून शालेय साहित्यापासून वंचित आहेत.
केंद्रीय शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार शिक्षण मंडळातील सदस्यांचे अधिकार काढून ते महापालिका आयुक्तांना देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, नेमके कोणते अधिकार सदस्यांना आणि अधिका:यांना याविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे वह्या, कंपास पेटी, खडू व चित्रकला साहित्याविषयीची निविदा प्रक्रिया राबविली आहे. परंतु, त्यानुसार निर्णय कोणी घ्यायचा, यावरून शैक्षणिक साहित्य खरेदीचा निर्णय रखडला आहे.
त्याविषयी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया प्रशासनाने राबविली आहे. आतार्पयत शिक्षण मंडळाच्या सदस्यांना खरेदीस उशिर झाला की टार्गेट केले जायचे. आता सर्व अधिकार प्रशासनाला असताना शालेय साहित्य खरेदीला उशीर होत आहे. त्यावर शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी समितीची बैठक झाली. वह्या व शालेय साहित्यांचे दर बाजारातून घेतले जात आहेत. त्यामुळे विलंब होत असला तरी, दोन दिवसांत निर्णय होईल. (प्रतिनिधी)
दोन आठवडय़ांपासून घेताहेत निर्णय..
शिक्षण मंडळ जादा दराने वह्यांची खरेदी करीत असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला. त्यानंतर पहिली निविदा रद्द करून दुस:यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार वह्यांचे प्रयोगशाळेतील नमुने येऊन दोन आठवडे झाले, तरी प्रशासन निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.