शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी केली महावितरण कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 19:55 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली.

पुणे  - वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली. कोंढवा परिसरातील कार्यालयाची मंगळवारी दुुुपारी बाराच्या सुमारास ही तोडफोडीची घटना घडली.  याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मनसे नगरसेवकासह कार्यकर्त्यांना अटक केली . नगरसेवक  साईनाथ संभाजी बाबर (वय-37) यांच्यासह चंद्रशेखर सुभाष लोणकर (वय-42), अमित शिरस (वय-38), सतिश शिरस (वय-37), कुणाल गोंधळे (वय-26), अमित जगताप (वय-37) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहायक अभियंता लिंगाप्पा बाधे (वय-51, रा. वृंदावननगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात मागील अनेक दिवसांपासूनवीजपुरवठा सुरळीत नव्हता. याप्रकरणी नागरीकांनी तक्रारी करूनही त्यांचे निरसन  केले जात नव्हते. त्यामुळे बाबर हे कार्यकर्त्यांसह निवेदन घेऊन महावितरणच्या कार्यालयात आले. त्यानंतर बाधे यांच्या कक्षात येऊन तुम्ही काम करत नाही, तुमच्यामुळे लोकांना त्रास होतो असे बोलून कक्षातील काचा, प्रिन्टर, फोन या वस्तू लाकडी दांडक्याने तोडले. तसेच, कार्यालयात असणा-या वस्तू इतरत्र फेकून देऊन सव्वा दोन लाखांचे नुकसान करून बाधे व महावितरणचे कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलिस निरीक्षक पावसे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMNSमनसे