मुळशी धरण परिसरातील शेतकऱ्यांची पावसामुळे धांदल
By Admin | Updated: October 28, 2015 23:49 IST2015-10-28T23:49:27+5:302015-10-28T23:49:27+5:30
मुळशी धरण परिसरात संध्याकाळी आकस्मिक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. भात कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांची पीक वाचविण्यासाठी धावपळ झाली

मुळशी धरण परिसरातील शेतकऱ्यांची पावसामुळे धांदल
पौड : मुळशी धरण परिसरात संध्याकाळी आकस्मिक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. भात कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांची पीक वाचविण्यासाठी धावपळ झाली. अनेकांचे भात पीक भिजले. धरण परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी राहिले.
बहुतांशी शेतकऱ्यांनी भात लागवडीपासूनच मुळा नदीच्या पाण्याचा आधार घेऊन पिके जगवली. भातपिकेही चांगलीही आलेली आहेत. मागील काही दिवस कोरडे वातावरण असताना मात्र पावसाने चारच्या सुमारास माले परिसरात अचानक तासभर हजेरी लावली. पीक काढणीस आल्याने तसेच वातावरण कोरडे व कडक उन पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात पीक कापून वाळवण्यासाठी शेतात पसरवून ठेवले होते. काही शेतकऱ्यांनी यंत्रांच्या मदतीने भात कापणी करुन भात वाळण्यासाठी उन्हात ठेवले होते. या शेतकऱ्यांची अचानक आलेल्या मध्यम पावसाने मोठी धावपळ झाली. एका जागी पसरवून ठेवलेले भातावर ताडपत्री टाकून काही शेतकऱ्यांनी पीक झाकून टाकले. ज्या शेतकऱ्यांनी भात पीक कापून शेतातच जागेवर वाळत ठेवले होते. (वार्ताहर)