शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे २३ धोकादायक गावांची विकास कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 19:36 IST

जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.

ठळक मुद्देधोकादायक गावांसाठी जिल्हा प्रशासनाला यंदा ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर

पुणे: माळीण दूर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकास कामे पावसामुळे ठप्प आहेत.राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे धोकादायक गावांची कामेही निविदा प्रक्रियेत अडकून राहिल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.त्यानुसार संबंधित गावांच्या भोवती सुरक्षा भिंत बांधणे,पावसाच्या पाण्याला योग्य दिशा देणे, झाडे लावणे आदी कामे केली जाणार होती.त्यामुळे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.गेल्या वर्षी ही या गावांच्या विकास कामांसाठी निधी नव्हता.त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेण्याबाबत चर्चा झाली होती.या धोकादायक गावांसाठी जिल्हा प्रशासनाला यंदा मार्च महिन्यात ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.परंतु,या गावांमधील विकास कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि वन विभासह इतर विभागांची मान्यता घेणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी झाली नाही. मात्र,एकूण धोकादायक 23 गावांपैकी १६ गावांतील कामांना सुरुवात झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.भोर तालुक्यातील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशी तालुक्यातील घुटके आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे ही गावे वन क्षेत्रात येत असल्याने या गावांच्या कामासाठी वन विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांची कामे सुरू करण्यास  विलंब झाला.जिल्हा प्रशासनातर्फे काही गावांची विकास कामे सुरू करण्यात आली होती. तर काही गावांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे .--------------------जिल्ह्यातील दरडप्रवण गावे : फुलवडे जवळील भगतवाडी, माळीण परिसरातील परसवाडी, आसाणे, जांभोरीजवळील काळेवाडी आणि बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर).

टॅग्स :PuneपुणेMalingaonमाळीणगावRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका