पोलिसांच्या तत्परतेमुळे शिक्षकाला मिळाले हातउसने घेतलेले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST2021-02-12T04:11:15+5:302021-02-12T04:11:15+5:30
शिक्षकाकडून घेतलेले हात उसने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीस पोलिसी खाक्या दाखवताच व्यक्तीने शिक्षकाचे पैसे परत केले. ...

पोलिसांच्या तत्परतेमुळे शिक्षकाला मिळाले हातउसने घेतलेले पैसे
शिक्षकाकडून घेतलेले हात उसने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तीस पोलिसी खाक्या दाखवताच व्यक्तीने शिक्षकाचे पैसे परत केले. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यतत्परतेमुळे शिक्षकाला त्याचे पैसे माघारी मिळाले.
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील शिक्षक राजेश कुंभार यांनी त्यांच्या एका मित्राला दिवाळी सणासाठी २० हजार रूपये हातउसने दिले होते. मात्र पैसे मागितले की ही व्यक्ती टाळाटाळ करू लागली. तसेच वारंवार मागणी करून देखील पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुंभार यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या वेळी उपस्थित पोलिस कर्मचारी ठोंबरे व कुंभार यांनी सबंधीत व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिस कर्मचाऱ्यांनी पैशांबाबत विचारणा केली असता. आपण राजेश कुंभार यांना ओळखत नाही. कसले पैसे आपणाला काहीही माहिती नाही, असे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सदर इसमाने आपण पैसे घेतल्याचे मान्य करीत राजेश कुंभार यांचे पैसे माघारी केले.