Due to a message, 'she' was released from the brothel | एका मेसेजमुळे ‘ती’ची झाली कुंटणखान्यातून सुटका

एका मेसेजमुळे ‘ती’ची झाली कुंटणखान्यातून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : 下‘ती载 मूळची पश्चिम बंगालची. एका व्यक्तीने पुण्यात नोकरी देतो असे, आमिष दाखवून बुधवार 下पेठेमध्ये载 सोडून तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले. 下२०१८载 下सालची载 下ही载 घटना. 下एक载 वर्षानंतर एका 下ग्राहकामार्फत载 तिने आपल्या मुलाला मेसेज केला आणि पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर अखेर त्या 下अंधाऱ्या载 下कोठडीमध्ये载 आयुष्य जगणाऱ्या 下‘ती’ची载 सुटका झाली. न्यायालयाने 下या载 पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.

४५ वर्षीय महिला दोन मुलांची आई आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला पुण्यात आणले आणि देहविक्रय करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले. तिच्या एका ग्राहकाला तिने दु:ख सांगितले आणि त्यानेही माणुसकीच्या नात्याने तिच्या मुलाला मेसेज पाठविण्यास सहकार्य केले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर तिच्यासह एका महिलेची सुटका झाली. फरासखाना पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२० मध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. डिसेंबरमध्ये मुलगा पुण्यात आला आणि त्याने वकिलांमार्फत न्यायालयात आईच्या ताब्याकरिता न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर अॅड. पुष्कर दुर्गे आणि ॲड. तेजलक्ष्मी धोपावकर यांनी महिलेचा मुलगा तिची काळजी घेईल व परत ती अशा घटनेची बळी होणार नाही. याची खबरदारी घेईल. तसेच पीडित महिला न्यायालयात गरज पडेल तेव्हा साक्ष देण्यासाठी हजर राहील, असे सांगून न्यायालयात पीडित महिला व मुलाची बाजू मांडली. मात्र पीडित महिला व तिचा मुलगा यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे बंगाली भाषेत असल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत अडसर निर्माण झाला. परंतु वकिलांनी दोघांची एलआयसी पॉलिसी न्यायालयात दाखल केली. ज्यामध्ये इंग्रजी भाषेत दोघांच्या नात्याबद्दल लिखित पुरावा होता, असे ॲड. धोपावकर यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी??????? (दि.२) पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Due to a message, 'she' was released from the brothel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.