मोरगावात दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा
By Admin | Updated: June 18, 2015 23:23 IST2015-06-18T23:14:45+5:302015-06-18T23:23:11+5:30
मोरगाव प्रादेशिक योजनेतील नवीन लोखंडी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या योजनेवरील १७ गावांना गेल्या १० दिवसांपासून

मोरगावात दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा
मोरगाव : मोरगाव प्रादेशिक योजनेतील नवीन लोखंडी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या योजनेवरील १७ गावांना गेल्या १० दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या टाकीची मुदत संपली आहे. याबाबत नवीन टाकी मिळण्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला आहे. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने टाकीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे पिण्याच्या पाण्याचा नळ पाणीपुरवठा अनियमित होत आहे. सध्या नवीन लोखंडी जलवाहिनी जोडण्याचे काम नाझरे येथून सुरू आहे.
यामुळे नियमित पाणीपुरवठा पुरविण्यात अडचणी येत आहेत.यावर पर्यायी सुविधा करण्यासाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्राम तावरे यांनी केली आहे.यामुळे नळाला विद्युत मोटारी सोडुनही हंडाभर पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.
याबाबत उपसरपंच दत्तात्रय ढोले यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी गावठाणासाठी ३ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे सांगितले. (वार्ताहर)