शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:17 IST

पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

पुणे : पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ‘‘रात्री उशिरा लांबून पाणी आणावे लागते. त्यासाठी शेतीतून जावे लागते. आता अचानक बिबट्याने हल्ला केला तर काय करायचे? पाणी तर आणावेच लागेल.’’ अशा भावना मांजरी परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. यावरून बिबट्याची चांगलीच दहशत बसल्याचे स्पष्ट होत आहे.केशवनगरमध्ये रविवारी सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्याची जरब बसली आहे. कधी कुठून कसा बिबट्या येईल आणि आपल्यावर हल्ला करेल, याची शाश्वती राहिलेली नाही. कारण आता पुणे शहरात अनेक ठिकाणाहून बिबट्या एन्ट्री मारत आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला, शिवणे परिसरात तो दिसला होता, तर एक-दोन वर्षांपूर्वी कोंढवा परिसरात आढळला होता. त्यामुळे भविष्यातही बिबट्या पुण्यात येऊ शकत असल्याने त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत.मानव आणि बिबट्यामधील संघर्ष वाढत आहे. त्यामुळे बिबट्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री, प्रशिक्षण दिलेले पथक, कुरण क्षेत्राचा विकास आदींवर काम करणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी याबाबतचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. परंतु, त्यावर काहीच काम केलेले दिसून येत नाही. ते केले तर कदाचित बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.बिबट्या ज्या परिसरात येण्याची शक्यता आहे, तर त्या परिसरात त्याबाबत जनजागृती केली पाहिजे. तसेच रात्रीच्या वेळी काम करणाºयांमध्ये योग्य सुरक्षासाधनांची माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून बिबट्याने हल्ला केला तर कसा बचाव करता येईल, हे नागरिकांना समजेल. त्यासाठी वन विभागाने काम करणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये बिबट्यांबाबत चांगले काम झाले आहे. त्याची माहिती घेऊन पुण्यात तसे करणे गरजेचे असल्याचे वन्यजीव अभ्यासक डॉ. विद्या आत्रेय यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजूबाजूला स्वच्छता ठेवावीआपल्या आजूबाजूला कचरा साठला असेल तर तो साठू देऊ नये. कारण त्यामुळे कुत्री, डुकरे, मांजरे, उंदीर तिथे अधिक प्रमाणात आढळतात आणि त्यांना खाण्यासाठी बिबट्या येऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे, अशी माहिती जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.डेअरी फार्ममध्ये हरिण, ससे, मोर...मुंढवा : काही नागरिकांनी तरी बिबट्याच्या भीतीने सकाळी व सायंकाळी फिरायला जाणेही बंद केले आहे. कारण केशवनगच्या पुढे डेअरी फार्ममध्ये अजून एखादा बिबट्या असेल तर... या काळजीने नागरिक धास्तावलेले दिसत आहेत. केशवनगर भागात सद्यपरिस्थितीत १० टक्केच शेतीचा भाग राहिलेला आहे. परंतु केशवनगरच्या हद्दीच्या पुढे व मांजरी बुद्रुकच्या हद्दीत साधारण २०० एकर जागेत डेअरी फार्मचे जंगल परिसर आहे. पूर्वी याठिकाणी मिलिटरीचा डेअरी फार्म होता. तेथे मोठ्या प्रमाणात गाई होत्या. परंतु काही वर्षांपूर्वी येथील डेअरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात जंगलच आहे. तिथे सध्या मोठ्या प्रमाणात मोर, साप, हरणे, ससे व जंगली कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या भागात अजूनही एकटा मनुष्य जात नाही. सोमवारी जो बिबट्या केशवनगरमध्ये आला, तो मादी असल्याचे समजते. या जंगलात भक्ष्याच्या शोधात त्याचे वास्तव्य असल्याचे नाकारता येत नाही. या परिसरात तिचे पिल्लेही असू शकतात, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.बिबट्या येणाºया क्षेत्रात सतर्कतारात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावी, त्यामुळे बिबट्या जवळ येत नाहीपाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठे तयार करावेतशेतात किंवा उसामध्ये रात्रीच्या वेळी जाऊ नयेघराबाहेर झोपणे टाळावेरात्री घराबाहेर पडताना हातात काठी असावीस्ट्रॉर्च घेऊन फिरावे

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे