आयटीआय फीसाठी पैसे नसल्याने तरुणाने जीवनयात्राच संपवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:51 PM2018-08-24T23:51:45+5:302018-08-24T23:53:01+5:30

डिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फीची रक्कम नसल्यामुळे गळफास घेत साईनाथने आपला जीवनप्रवास संपविला. मुळातच मामाच्या ब्लॉक पिस्टन रीबोरिंग गॅरेजमध्ये फिटर मदतनीस म्हणून तो काम करीत होता.

Due to lack of ITI fees, the young man ended his life | आयटीआय फीसाठी पैसे नसल्याने तरुणाने जीवनयात्राच संपवली

आयटीआय फीसाठी पैसे नसल्याने तरुणाने जीवनयात्राच संपवली

googlenewsNext

भिगवण : आयटीआय प्रवेश मिळूनही फीसाठी पैसे नसल्याच्या कारणाने १८ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत जीवन संपविले. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास घडली. याच आठवड्यात दुसऱ्या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याने परिसरातील पालकांनी हळहळ व्यक्त करीत धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.

भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : चिंतामणी नाना सोनावणे (रा. मदनवाडी) यांनी याबाबत खबर दिली आहे. त्यांचा भाचा साईनाथ राजेंद्र पोपळघट (वय १८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता. गेल्या आठवड्यापासून साईनाथ आपले मामा आणि आई यांना शाळेची फी भरण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. मामाच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि आई पुणे येथे धुण्या-भांड्याची कामे करून गुजराण करीत असल्यामुळे आपणाकडे फी देण्याइतके पैसे जमा झाले की लगेच फी भरू, असे सांगत आठवडा लोटल्यानंतरही पैसे न मिळाल्याने अखेर साईनाथ याने
असे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर येत आहे. याच आठवड्यात गिरीश संजय गरगडे (वय २०) याने मदनवाडी-बारामती रस्त्यावरील ढवळे यांच्या विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे.

डिझेल मॅकनिक होण्याचे होते स्वप्न
डिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फीची रक्कम नसल्यामुळे गळफास घेत साईनाथने आपला जीवनप्रवास संपविला. मुळातच मामाच्या ब्लॉक पिस्टन रीबोरिंग गॅरेजमध्ये फिटर मदतनीस म्हणून तो काम करीत होता. १२ वर्षांपूर्वी साईनाथचे वडील त्याची आई आणि १६ वर्षांच्या बहिणीला सोडून अचानक निघून गेल्याने त्यांचे कुटुंब उघडे पडले. साईनाथच्या आईने मुलांची पोटाची खळगी भरावी यासाठी मिळेल ते काम करून संसार चालवीत आपल्या भावाकडे मुलांना शिक्षणासाठी ठेवले होते.

साईनाथने १० वी पास होताच मामाच्या गॅरेजमध्ये काम करत डिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न पाहत भिगवण येथील थोरात औद्योगिक शाळेत प्रवेश घेतला होता. फीसाठी पैैसे नसल्याने साईनाथ बारामती येथील मोठ्या दुकानात काम करत पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा विचार आईशी बोलला होता. आईने त्याच्या काळजीपोटी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही याने तो निराश होता. त्याने दिवसभर भेटणाºया प्रत्येकाला अदबीने आणि हसऱ्या चेहऱ्याने फीबाबत होत असलेल्या अडचणीची माहिती दिली. तर मामाला अनेक वेळा फी मागूनही ती न दिल्यामुळे अखेर साईनाथने या जगाचाच निरोप घेतला.

Web Title: Due to lack of ITI fees, the young man ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.