शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

उरूळी कांचन येथे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून टळला अनर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:15 IST

मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने तणाव निर्माण पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न

उरूळी कांचन : मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (३०जुलै) हवेली तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान येथे आंदोलनकर्ते व व्यापारी यांच्यात बाचाबाची व नंतर मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पण या वादाला वेगळीच किनार असल्याची नागरिकांमधील दबक्या आवाजातील चर्चेची पोलिसांनी नोंद घेतली असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.त्यात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.    दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंदच्या आंदोलनास उरुळी कांचन मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. त्यामुळे आज पुन्हा बंद पाळण्याबाबत व्यापारी वर्गात द्विधा मनस्थिती होती. त्यानुसार, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त कुमक मागवून उरुळी कांचन शहरात बंदोबस्तासाठी तैनात केला. मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वत:हून दुकाने बंद ठेवली होती. परंतु, महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी विद्यालय येथे मोर्चा नेत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काहींनी विरोध दर्शविला. यादरम्यान, व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मंडलअधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत आरक्षण मिळाले पाहिजेचा नारा दिला व ते जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ते चालूच राहील, असा इशारा दिला.लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करत सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस