शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

गुप्तचर यंत्रणेमुळेच यशस्वी सैन्य कारवाया शक्य-लेफ्टनंट नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 05:38 IST

‘आर. एन. काव - जेंटलमन स्पाय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : गुप्तचर यंत्रणा आणि सैन्य कारवाया या हातात हात घालून कार्य करीत असतात. कुठलीही सैन्य कारवाई असो तिचे यश हे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या गोपनीय माहितीवर अवलंबून असते. ही माहिती आम्हाला इंटेलिजन्स ब्यूरो आणि रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’ या गुप्तचर संस्थांकडून मिळत असते, असे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख आणि भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पाय मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी रॉचे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, गुप्तहेर हा नेहमीच पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्य करीत असतो. त्यांनी दिलेली माहिती ही देशासाठी तसेच सैन्यदलासाठी मोलाची असते. या पुस्तकात रॉचे निर्माते आर. एन. काव यांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे.

‘रा’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन म्हणाले, भारतीय गुप्तचर विभागाने अनेक मोहिमा यशस्वी केल्या; मात्र त्यांच्या मोहिमांची माहिती देणारी कुठलीच कागदपत्रे उघड करण्यात आलेली नाहीत. पाकिस्तानविरोधात जिंकलेली युद्धे, बांगलादेशाची निर्मिती, आॅपरेशन गोल्डन टेम्पल यासारख्या मोहिमांत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. आज रशिया, अमेरिका, इंग्लंड यासारखे देश त्यांच्या गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांच्या माहितीची कागदपत्रे एका ठराविक काळानंतर उघड करतात. आपल्याकडेही युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता ही माहितीपत्रे उघड व्हायला हवी.निवड प्रक्रियेत बदल व्हावाच्उमराणीकर म्हणाले, आर. एन. काव यांनी रॉची स्थापना केली. ही संस्था त्यांनी उभी करताना देशहित जपले. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या.च्एखादा शिक्षित हा चांगला गुप्तचर असेलच असे नाही. यामुळे ‘रॉ’साठीच्या निवड प्रक्रियेत बदल व्हावा, अशी अपेक्षा ‘रॉ’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPuneपुणे