शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी हरणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:04 IST

पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याने दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना भीमाशंकर अभयारण्यात येलवळी (ता. खेड) येथे शनिवारी घडली.

डेहणे  पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याने दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना भीमाशंकर अभयारण्यात येलवळी (ता. खेड) येथे शनिवारी घडली.रखरखीत उन्हाचे चटके मानवाप्रमाणे वन्यप्राण्यांनाही बसत आहेत. अन्न -पाण्याच्या शोधात ते सैरभैर झाले असून, त्यांच्यावरही जंगल सोडून भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.सुभाष डोळस यांना त्यांच्या मालकीच्या विहिरीत डोकावून पाहिल्यावर दोन भेकर जातीची हरणं पाण्यात पडली असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ही घटना भीमाशंकर वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवली. वनरक्षक के. के. दाभाडे व वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने मृत हरणांना पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. भीमाशंकर, भोरगिरी, येळवळी या परिसरात भेकर जातीची हरणे, ससे, सांबर असे अनेक प्राणी अधिवास करत आहेत.भीमाशंकर अभयारण्यात मात्र आता हेच जंगली प्राणी सुरक्षित नसल्याची परिस्थिती या घटनेतून पाहायला मिळत आहे. कधी या प्राण्याची शिकार केली जाते, तर कधी पाण्याअभावी मृत्यू होतात. या प्राण्यांच्या सुरक्षितता तसेच संगोपनाची जबाबदारी वनविभागाकडे असतानाही प्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे तक्रार करूनही या परिसरात पाणवठे उभारले गेले नसल्याचा आरोप प्रदीप चव्हाण,धोंडू बाणेरे, खंडू बाणेरे, शंकर बाणेरे,राजू बानेरे,सुभाष डोळस, दशरथ बाणेरे, गौतम डोळस, लहू मेठल हे स्थानिक नागरिक करत आहे.काही प्राणी मानवीवस्त्यांकडे कूच करीत आहेत. त्यात हरणांच्या प्रजातींचाही समावेश आहे. भीमाशंकर अभयारण्यात डोंगराळ भाग अधिक आहे. हरणांच्यासह वन्यजिवांच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्यालगत असणाºया दाट झाडीत, नदीकाठच्या झाडीत विविध प्राण्यांसह पक्ष्यांचा कायम वावर आहे. मार्च, एप्रिलमध्ये सैरभैर होणारे वन्यजीव या वेळी मानवीवस्तीकडे धाव घेऊ लागले.पाणवठे कागदावरचभीमाशंकर अभयारण्यांतर्गत येणारा निधी या परीक्षेत्रात वन्यप्राण्यांना पाणवठे,आगीपासून संरक्षण करण्यासाठी जाळपट्टे काढणे,नवनवीन तलाव बांधणे,आवश्यक ठिकाणी जाळीचे कंपाउंड करणे,वन्यप्राण्यांना निवारा तयार करणे आदी अत्यावश्यक कामावर खर्च करण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असूनही गेल्या काही वर्षांत वनविभागाच्या अधिकाºयांकडूनच यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने फक्त कागदोपत्री कामं दाखवली जात आहेत.या परिसरातील भोरगिरी,येळवळी,निगडाळे या वनसमित्यांनी अनेकदा मागणी करूनही वनविभागात कुठे खर्च केला, याची माहिती दिली जात नाही. कोट्यवधी रुपये खर्च झाले परंतू वनविभागाच्या हद्दीत प्राण्यांना निवारा तर नाहीच, परंतु शिकार मात्र राजरोसपणे सुरु आहेत.कागदावर शेकडो पाणवठे असून पाण्यासाठी भटकंती करताना वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव तर जाळपट्टे काढूनही जंगलं आगीत भस्मसात कशी होताहेत, हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवPuneपुणे