भिज पावसामुळे घराची भिंत पडली
By Admin | Updated: September 3, 2014 00:29 IST2014-09-03T00:29:48+5:302014-09-03T00:29:48+5:30
परदेशपुरा जुन्नर याठिकाणी मंगळवार (दि. 2) रोजी पहाटे पाच वाजता एका दुमजली घराची भिंत पडली.

भिज पावसामुळे घराची भिंत पडली
जुन्नर : परदेशपुरा जुन्नर याठिकाणी मंगळवार (दि. 2) रोजी पहाटे पाच वाजता एका दुमजली घराची भिंत पडली. त्यामुळे त्या घराशेजारील इतर पाच-सहा छोटय़ा घरांचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. त्यामुळे दहा ते अकरा जणांचे प्राण वाचले.
या दुमजली मातीच्या घराशेजारील पाच-सहा छोटी घरे ढिगा:याखाली गाडली गेली. घडलेली घटना रहिवाशांच्या तत्काळ लक्षात आल्याने विशाल परदेशी, लखन परदेशी, अजय परदेशी, अमर परदेशी, भारत परदेशी, फकिरा परदेशी व काही वृद्ध महिलांनी घराबाहेर
पळाल्याने मोठी जीवितहानी टळली व क्षणात मोठी भिंत कोसळली.
जुन्नर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे व घराची भिंत मातीची असल्याने ओल पकडून हा प्रकार घडला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. (वार्ताहर)
घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे. शासनस्तरावर जी मदत करता येईल. त्यासाठी लवकरात लवकर प्रय} करण्यात येतील.
- पी. एन. हिरामणी, तहसीलदार
4घराची भिंत पडल्याचे समजताच नगरसेवक सुजित परदेशी, आनंद परदेशी, पापा खोत यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच, घडलेल्या घटनेची माहिती प्रशासनास दिली. त्यावरून जुन्नरचे तहसीलदार पी. एन. हिरामणी यांनी पाहणी करून तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यावरून जुन्नरचे सर्कल लवांडे, तलाठी गायकवाड यांनी पंचनामा केला. तसेच घडलेल्या घटनेच्या ठिकाणी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित कु:हाडे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुंभार यांनी पाहणी केली. या घटनेमुळे पाच-सहा घरांत राहणा:या नागरिकांचा गृहोपयोगी वस्तू ढिगा:याखाली गाडल्या गेल्याने त्यांचासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.