शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धरणसाखळीत पावसाचा जोर कायम; जिल्ह्यातील धरणात ७१.२८ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:46 IST

रखडलेल्या पेरण्यांना वेग; खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढला

घोडेगाव : जिल्ह्यातील १६ प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्व धरणांत आतापर्यंत ७१.२८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७४.५० टक्के पाणीसाठा झाला होता. यावर्षी जिल्ह्याच्या पूर्व भागात म्हणावा असा पाऊस पडला नसला, तरी उत्तर भागात असलेल्या आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पडलेल्या पावसाने धरणे भरत आली आहेत.पुणे जिल्ह्यात पावसाने सुरूवातीला चांगली हजेरी लावली होती. यानंतर पावसाने दडी मारली होती. लावण्या सुरू झाल्यावर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने काही दिवस लागवडही रखडली होती. पूर्व भागात पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. पावसाच्या दडीमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. यानंतर जुलै महिन्यत पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. धरण परिसारात पावसाचा जोर कायम असून यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यातील प्रमुख १६ धरणांची यावर्षी व मागील वर्षीची आकडेवारी पाहिली असता खडकवासला यावर्षी १०० टक्के तर मागील वर्षी १९.४१ टक्के भरले होते. गुंजवणी धरण यावर्षी ५७.६४ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी धरणात ६७.५१ टक्के पाणी साठा होता. धरण परिसात पावसाचा जोर कायम आहे. घोड धरणात ३४.०२ टक्के पाणीसाठ झाला आहे. गेल्या वर्षी धरणात ६२.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 

टॅग्स :DamधरणPuneपुणेRainपाऊस