शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खोल खड्ड्यात पडलेले हरिण जवानांमुळे सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:55 IST

वारजे येथील डुक्कर खिंड लगतच्या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यात पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले आहे. 

पुणे : वारजे येथील डुक्कर खिंड लगतच्या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यात पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामन दलाच्या जवानांना यश आले आहे. 

 रविवार रात्री आठ वाजता एक हरिण वारजेतील डुक्करखिंड रस्त्यालगत असणा-या डोंगराळ भागात एका खोल खड्ड्यामधे किमान वीस ते पंचवीस फुट खाली पडले होते. खड्डयामधे ब-याच प्रमाणात मोठी दगडे, पालापाचोळा, गवत व पाणी असल्याने त्या हरिणास बाहेर पडणे जमत नसल्याचे स्थानिकांनी पाहिले व त्यांनी प्राणी मित्र प्रतिक महामूनी यांना मोबाईलवरुन ही माहिती कळविले.  महामूनी व वनविभागाचे कर्मचारी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. 

सिहंगड अग्निशमन केंद्राचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पाहिले की, हरिण जिवंत स्थितीमध्ये असून खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत तिथेच त्याची तेवढ्याच भागात धावाधाव सुरु आहे. त्याची सुटकेची बेचैनी पाहात जवानांनी दोरी व जाळीच्या सहा्याने त्याला वर घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, हरिण  भेदरलेल्या स्थितीत असल्याने त्याला जाळीमध्ये घेणे अवघड जात होते. पण शेवटी सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये घेण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. बाहेर काढल्यानंतर त्याला काही प्रमाणात किरकोळ जखमा झाल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी जवानांनी कात्रज प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधून अग्निशमन वाहनातून हरणाला तिथे प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात दिले. 

या साहसी कामगिरीमध्ये चालक भरत भुजबळ तसेच तांडेल रोहिदास दुधाणे व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, भारत पवार यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Puneपुणे