शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक कामांमुळे २० दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 21:06 IST

लोकसभा निवडणूक कामांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने मंगळवारी दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प पडले.

ठळक मुद्देयंदाच्या आर्थिक वर्षांत २२ हजार २२० कोटींचा महसुल जमा

पुणे : लोकसभा निवडणूक कामांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने मंगळवारी दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प पडले. शहरातील २८ पैकी तब्बल २० कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणी करता आली नाही. राज्यात दररोज अकरा ते बारा हजार दस्त नोंदणी होते. त्यात मुंबई, ठाणे आणि पुण्याचा वाटा अधिक असतो. पौड रस्ता आणि लष्कर भागातील दोन कार्यालये सकाळी सातला सुरु होतात. त्यांना देखील दुपारी निवडणुक कामकाजाबाबत माहिती मिळाल्याने, सुमारे तासाभराचे कामकाज होऊ शकले नाही. तर, वीस कार्यालये बंद होती. कार्यालयाचे कामकाज बंद झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. राज्याच्या कर आकारणी आणि महसुल वसुलीवर परिणाम होऊ नये यासाठी विक्रीकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, नोंदणी व मुद्रांक  शुल्क विभाग, अकृषी कर वसुलीसाठी निर्माण करण्यात आलेल्या पथकांना निवडणूक कामकाज देऊ नये असा आदेश राज्य सरकारने १९९७ रोजी काढला होता. अर्थात हा निर्णय त्यावेळच्या स्थानिक निवडणूकांसाठी लागू होता. मुद्रांक शुल्क विभाग राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर महसुल मिळवून देतो. यंदाच्या आर्थिक वर्षांत २२ हजार २२० कोटींचा महसुल जमा झाला आहे.  ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते श्रीकांत जोशी म्हणाले, मुद्रांक विभाग हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने या पुर्वी निवडणुक कामकाजातून वगळलेल्या विभागात हा विभाग देखील येतो. या विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देऊ नये. मुद्रांक कार्यालये नागरिकांशी संबंधित आहेत. कोणतीही सूचना न देता कार्यालये अचानकपणे बंद केली गेली. त्यामुळे बाहेरून आलेले पक्षकार, ज्येष्ठ नागरिक, महिला  यांचे अतोनात हाल झाले. ज्या कार्यालयाकडून महसूल जमा होतो, अशी कार्यालये बंद ठेवता येत नाहीत. नागरिकांना त्रासाला सामोरे जाऊ नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे काम देऊ नये, असे असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovernmentसरकार