शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
3
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
4
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
5
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
6
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
7
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
8
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
9
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
10
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
11
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
12
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
13
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
14
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
15
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
16
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
17
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
18
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
19
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
20
खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा

घोडनदीत बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2017 03:51 IST

नगरपरिषदेचे कर्मचारी गोविंद ऊर्फ बाबा सदाशिव ढवळे (वय ५३) यांचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढवळे

शिरूर : नगरपरिषदेचे कर्मचारी गोविंद ऊर्फ बाबा सदाशिव ढवळे (वय ५३) यांचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढवळे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.ढवळे यांचा घोडनदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात पोहायला जाण्याचा नित्यक्रम होता. दररोजप्रमाणे ते दुपारी चारला बंधाऱ्यावर कोहकडी (ता. पारनेर) च्या बाजूने नदीत पोहायला गेले, नेहमीच्या वेळेत ढवळे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी बंधारा गाठला. नदीच्या किनारी ढवळे यांची दुचाकी, कपडे व चपला दिसून आल्या.शंका आल्याने कुटुंबीयांनी सभोवतालच्या लोकांना बोलावले. याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना संपर्क साधल्यावर गावडे हे माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे यांच्यासह नदीवर पोहचले. तहसीलदार राजेंद्र पोळ, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडीवाल हे देखील तेथे पोहचले. स्थानिक मच्छिमारांच्या साह्याने ढवळे यांना शोधण्याचा प्रयत्न केला. रात्री शोध थांबवण्यात आला. सकाळी पाणबुडी मागवण्यात आली.बबन कनिच्छे, शंकर मल्लाव, राजू मल्लाव, महादू सल्ले, सुभाष सल्ले या काची समाजाच्या व्यक्तींच्या मदतीने पाणबुडीच्या पथकाने ढवळे यांचा शोध घेतला.दुपारी बाराच्या दरम्यान, बंधाऱ्यापासून ४० ते ५० मीटर अंतरावरच ढवळे यांचा मृतदेह मिळून आला. यावेळी सकाळपासून तहसीलदार पोळ, निरीक्षक गावडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधीकारी पोळ, वाघमारे, कुरेशी, धारिवाल तसेच नगरसेवक अभिजित पाचर्णे, नीलेश गाडेकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान दळवी, मंगेश खांडरे आदी मदतीसाठी उपस्थित होते. (वार्ताहर)- ढवळे हे २० वर्षांपासून नगरपरिषदेत कार्यरत होते. नगरपरिषदेच्या दवाखान्यात त्यांनी बरेच वर्षे काम केले. सध्या ते करसंकलन विभागात कार्यरत होते. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.