घोडनदीत बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: April 16, 2017 03:51 IST2017-04-16T03:51:08+5:302017-04-16T03:51:08+5:30

नगरपरिषदेचे कर्मचारी गोविंद ऊर्फ बाबा सदाशिव ढवळे (वय ५३) यांचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढवळे

Due to drowning, the death of the employee | घोडनदीत बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

घोडनदीत बुडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिरूर : नगरपरिषदेचे कर्मचारी गोविंद ऊर्फ बाबा सदाशिव ढवळे (वय ५३) यांचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढवळे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले.
ढवळे यांचा घोडनदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात पोहायला जाण्याचा नित्यक्रम होता. दररोजप्रमाणे ते दुपारी चारला बंधाऱ्यावर कोहकडी (ता. पारनेर) च्या बाजूने नदीत पोहायला गेले, नेहमीच्या वेळेत ढवळे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी बंधारा गाठला. नदीच्या किनारी ढवळे यांची दुचाकी, कपडे व चपला दिसून आल्या.
शंका आल्याने कुटुंबीयांनी सभोवतालच्या लोकांना बोलावले. याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना संपर्क साधल्यावर गावडे हे माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे यांच्यासह नदीवर पोहचले. तहसीलदार राजेंद्र पोळ, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडीवाल हे देखील तेथे पोहचले. स्थानिक मच्छिमारांच्या साह्याने ढवळे यांना शोधण्याचा प्रयत्न केला. रात्री शोध थांबवण्यात आला. सकाळी पाणबुडी मागवण्यात आली.
बबन कनिच्छे, शंकर मल्लाव, राजू मल्लाव, महादू सल्ले,
सुभाष सल्ले या काची
समाजाच्या व्यक्तींच्या मदतीने पाणबुडीच्या पथकाने ढवळे यांचा शोध घेतला.
दुपारी बाराच्या दरम्यान, बंधाऱ्यापासून ४० ते ५० मीटर अंतरावरच ढवळे यांचा मृतदेह मिळून आला. यावेळी सकाळपासून तहसीलदार पोळ, निरीक्षक गावडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधीकारी पोळ, वाघमारे, कुरेशी, धारिवाल तसेच नगरसेवक
अभिजित पाचर्णे, नीलेश गाडेकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान दळवी, मंगेश खांडरे आदी मदतीसाठी उपस्थित होते. (वार्ताहर)

- ढवळे हे २० वर्षांपासून नगरपरिषदेत कार्यरत होते. नगरपरिषदेच्या दवाखान्यात त्यांनी बरेच वर्षे काम केले. सध्या ते करसंकलन विभागात कार्यरत होते. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Due to drowning, the death of the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.