चर्चेच्या भीतीने मुख्यसभा तहकूब

By Admin | Updated: June 20, 2015 01:06 IST2015-06-20T01:06:00+5:302015-06-20T01:06:00+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळेतून महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून शिक्षण मंडळ

Due to discussion, the House of Representatives adjourned the meeting | चर्चेच्या भीतीने मुख्यसभा तहकूब

चर्चेच्या भीतीने मुख्यसभा तहकूब

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतून महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ तसेच माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांना अटक झाली आहे. या प्रकरणावर महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षांसह सर्व विरोधी पक्षांनी शुक्रवारी चुप्पी साधली. या प्रकरणाची चर्चा मुख्यसभेत होणार नाही, याची खबरदारी घेऊन अवघ्या पाच मिनिटांत जून महिन्याची सभा तहकूब करण्यात आली.
या लाच प्रकरणी मेमाणेंसह मंडळाच्या आजी-माजी अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यसभेत एखाद्या नगरसेवकाने याबाबत प्रश्न उपस्थित केला अथवा त्यावर विरोधी पक्षांनी काही मुद्दा उपस्थित केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाकडून आधीच सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून सभा तहकूब करण्याची विनंती करण्यात आली होती. त्याला सर्वपक्षीयांनी मूक संमती देऊन ही सभा येत्या सोमवार (दि. २२)पर्यंत तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)

सारे कसे शांत-शांत!
-गेल्या काही वर्षांत शिक्षण मंडळाच्या साहित्यखरेदीतील गैरव्यवहार, शाळांची दुरवस्था, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शिक्षण मंडळतील गैरभार यावरून महापालिकेच्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले जाते. मात्र, आज सर्व पक्षांचे नगरसेवक चिडीचूप होते. एकाही नगरसेवकाकडून मंडळाबाबत तोंडातून साधा ब्रही काढण्यात आला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. तर, शिक्षण मंडळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊनही कोणीही चर्चा केली नसल्याचीच चर्चा महापालिकेत रंगली होती.

Web Title: Due to discussion, the House of Representatives adjourned the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.